Home Uncategorized भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

1 second read
0
0
9

no images were found

भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

नाथाजी पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा गौरव; छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कौतुकास्पद

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, कोल्हापूरच्या वतीने युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ काल भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री नाथाजी पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेता तरुण मंडळ, रमणमळा, कसबा बावडा यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक हिंदवी ग्रुप, विचारे मळा, तर तृतीय क्रमांक संध्यामठ तरुण मंडळ यांनी मिळविला. विजेत्या मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच तरुणांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि दुर्गसंवर्धनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सहभागी मंडळांनी आकर्षक आणि ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश पाटील घरपणकर, तलहा मणेर, अनिकेत मुतगी, अनिरुद्ध भुरके, अनिकेत सोलापुरे, इंद्रजीत कवाळे, ओंकार गोसावी, अमित शिंदे, पृथ्वीराज पुरोहित, शिवम बुचडे, देवयानी पाटील यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी मंडळांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन…!

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन…