no images were found
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन. कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवसेना शाखा क्रमांक ३ बाल हनुमान मित्र मंडळाच्या हॉलमध्ये शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे”, ” परत या परत या बाळासाहेब परत या” या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला..
यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले,१७ नोव्हेंबर २०२६ आम्हां शिवसैनिकांचे दैवत, युगपुरुष, जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदुस्थानचे महानेता,वंदनीय हिदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या १४ व्या स्मृतीदिना निमित्त साहेबांच्या पवित्र स्मृतीस आम्ही करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो.
यावेळी उपस्थित करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, बाळासाहेब नलवडे, दीपक पाटील, संतोष चौगुले, विक्रम चौगुले, अरविंद शिंदे,योगेश लोहार, सचिन नाग
टिळक,शरद माळी, सागर पाटील, दत्ता फराकटे, प्रकाश मुदुगडे, अक्षय परीट, रामराव पाटील, नितीन निकम, धनंजय पाटील, अजित चव्हाण आदि शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते..