no images were found
अमृत- इंडो जर्मन टूल रूम या संस्थामध्ये सामंजस्य करार
पुणे : इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थेत उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. आय.जी.टी.आर. ने महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे या अंतर्गत अमृत संस्थेकडून इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) अमृत, पुणे या संस्थेमार्फत करण्यात येणार.
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकतील ज्या जातीना कोणत्याही शासकीय विभाग संस्था , महामंडळ यांच्या योजनेचा लाभ मिळत नाही अश्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकतील 18 ते 40 वयोगटातील पात्रताधारक युवक युवती सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत 15 निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम
तसेच 30 अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर.(छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर,वाळूज,पुणे, नागपूर, कोल्हापूर, अश्या उपकेंद्रात दिले जाईल. १० वी पास तसेच आय.टी.आय./डिप्लोमा/डिग्री उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवारचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे. याबाबत सविस्तर माहिती संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून सवाळंबनळाला चालना देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून अमृत च्या लक्षित गटातील युवक युवतिनि जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन अमृत चे व्यवस्थापकिय संचालक श्री. विजय जोशी यांनी केले आहे. इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी दिनांक : 20 सप्टेंबर २०२४ पर्यन्त अमृत च्या संकेतस्थळावर अर्ज करावे. तसेच योजेनच्या अधिक माहितीसाठी अमृत च्या संकेत स्थळाला www.mahaamrut.org.in भेट द्यावी.