no images were found
शासकीय योजनाच्या माध्यमातून घरोघरी शिवसेना पोहचवां -खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कोल्हापूर (प्रतिनिधी):- लोकसभेचा पूर्वानुभव पाहता विरोधकांकडून घरोघरी जाऊन खोटा अपप्रचार करण्यात आला. पण आता गाफिल न राहता लाडकी बहिण, अन्नपूर्णा अशा लोकहिताच्या योजनेतून घरोघरी पोहचून शिवसेनेचे काम पोहचवा, अशा सूचना शिवसेना संसदिय नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.
जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. जैन बोर्डिंग येथील बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याची धास्ती विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे खोटा अपप्रचार करण्याचा डाव या विधानसभा निवडणूकित विरोधकांकडून केला जाऊ शकतो. त्यामुळे गाफिल न राहता शासनाच्या योजनाच्या माध्यमातून घरोघरी पोहचा. जनसंवाद दौऱ्यामध्ये महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्या लाभार्थी महिलांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. शिवसैनिकांसह खासकरून महिला आघाडी, युवती सेनेने हे काम तंतोतंत करावे. मतदार संघातील जनसंपर्क वाढवावा जेणेकरून विरोधकांचा अपप्रचार मतदारचं खोडून काढतील. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा अशा सूचना दिल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला असून, याठिकाणी फक्त धनुष्यबाण चालतो. लोकसभेला विरोधकांचे मताधिक्याला लगाम लावला. या विधानसभेला आम्ही गाफिल न राहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनांचं पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी कोल्हापूरातून आम्ही सज्ज राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राहुल शेवाळे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी आमदार चंद्रदीप नरके, युवासेना महाराष्ट्र सचिव किरण साळी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, महिला आदी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित होते.