no images were found
तंत्रज्ञान अधिविभागात “अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४ उपक्रम” यशस्वीरीत्या संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४ स्पर्धा २ सप्टेंबर २०२४ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विविध नामांकित कंपन्या व संशोधन संस्था यांच्याकडून विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रश्न देण्यात आले होते, ज्यावर विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या माध्यमातून उपाय शोधायचे होते. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे ऐकून २५ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या महत्वाच्या अटीनुसार प्रत्येक संघामध्ये किमान एक तरी विद्यार्थिनी असणे गरजेचे होते, तसेच एका संघामध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश असणे आवश्यक होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या तांत्रिक प्रश्नावरील उपायांचे आकलन करून त्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये विभागातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशील आणि नवकल्पना सादर करण्याची संधी मिळाली, त्यामुळे शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्षात काम करण्याच्या कौशल्यांमध्ये अंतर कमी करण्यास मदत मिळाली. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा एक देशव्यापी नामांकित उपक्रम असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्णता आणि व्यावहारिक समस्यांचे समाधान करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देते आहे. तंत्रज्ञान अधिविभागामधील या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला असून, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.
या कार्यक्रमाचे आयोजन तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. एस. एन. सपली यांच्या अध्यक्षतेखाली. डॉ. जी. एस. पाटील, डॉ. जमीर बागवान, डॉ. ए. बी. मडावी, रुपाली धाबर्डे, डॉ. जी. एम. सोलंके, पी. एच. माने, व टी. आर. पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) डी. टी. शिर्के यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच प्र.कुलगुरू प्रा.(डॉ.) पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठातील इन्स्टिट्यूशन्स इंनोव्हेशन कौन्सिल, सेन्टर फॉर इंनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस व एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन यांचे सहकार्य लाभले.