
no images were found
यूवा सादर करत आहे स्टायलिश नव्या पेन्सिली : रिट्झ आणि ड्रीमी
मुंबई, : नवनीत एज्युकेशनच्या यूवा या स्टेशनरी ब्रँडने रंगीबेरंगी आणि उठावदार अशा यूवा रिट्झ आणि यूवा ड्रीमी या नव्या पेन्सिली सादर केल्या आहेत. व्यक्तिमत्त्व, उपयुक्तता आणि परवडणारी किंमत यांचा सुरेख मेळ असलेल्या नव्या डिझाइनमुळे या पेन्सिली विद्यार्थी, क्रिएटर्स आणि शैलीदार लेखनाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
रोजचे लिखाण आणि चित्रकलेचा अनुभव अधिक चांगला करण्याच्या दृष्टीने विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या रिट्झ आणि ड्रीमी या पेन्सिलींमध्ये स्मूथ व ठळक रेषांसाठी अल्ट्रा-डार्क 2बी लीड आहे. प्रत्येक पॅकमध्ये शार्पनर आणि खोडरबरही देण्यात आल्यामुळे हे एक परिपूर्ण स्टेशनरी पॅकेज झाले आहे. या पेन्सिलींच्या पॅकेजिंगला प्रीमियम मेटॅलिक फिनिश आहे आणि कम्फर्टेबल षटकोनी ग्रिप देण्यात आल्याने या पेन्सिली दिसायला जितक्या सुंदर आहेत, तितक्या हातातही अगदी छान वाटतात! त्यामुळे यांत उपयुक्ततता व स्टाइल यांचा परफेक्ट मेळ साधला गेला आहे.
रिट्झ आणि ड्रीमी पेन्सिलींच्या प्रत्येक पॅकमध्ये 10 पेन्सिली असून कल्पकता व वैयक्तिक स्टाइल झळकण्याच्या दृष्टीने त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. रिट्झला बोल्ड मॅट ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे आणि प्रत्येक पेन्सिलीमध्ये तीन खास रंगीत पॅटर्न आहेत. रंगांची उधळण आणि हटकेपणा आवडणाऱ्यांना या पेन्सिली नक्कीच आवडतील. दुसरीकडे, ड्रीमी पेन्सिलींमध्ये सौम्य, स्वप्नाळू व्हाइबची झलक दिसून येते. या पेन्सिली सूदिंग पेस्टल शेड्स, नाजूक ब्लू पर्ल टिन्टसह आहेत. तसेच प्रत्येक पेन्सिलीवर मिनी पॉ डिझाइन आहे. त्यामुळे या पेन्सिली मनाला भुरळ घालतात.
“लेखनाच्या साधनांद्वारे जशा कल्पना जिवंत होतात, तशीच ही साधनेही गमतीदार आणि अभिव्यक्तीक्षम असावीत, अशी यूवामध्ये आमची धारणा आहे. या नव्या पेन्सिली कल्पकतेला उत्तेजन देण्यासोबतच माफक किमतीत दर्जेदार उत्पादन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आल्या आहेत.”, असे यूवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर श्री. अभिजीत सान्याल म्हणाले.फक्त ₹7 या किमतीत उपलब्ध असलेल्या या पेन्सिली संपूर्ण भारतात तुमच्या जवळच्या स्टेशनरीच्या दुकानांमध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.