no images were found
संशोधकाने संशोधनाचे केंद्रबिंदू बदलत राहिले पाहिजे- डॉ. डि. टी. शिर्के
संशोधकाने संशोधनाचे केंद्रबिंदू बदलत राहिले पाहिजे असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डि. टी. शिर्के यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित पीएच. डी. मार्गदर्शक आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळेत उद्घाटनप्रसंगी बोलत होते. आपल्या मनोगत ते पुढे म्हणाले की, आपले संशोधन हे पुढच्या पिढीने संदर्भ म्हणून वापरले पाहिजे एवढे ते दर्जेदार झाले पाहिजे. तसेच संशोधनात संशोधकाने वाचन, चिंतन केले पाहिजे. प्रा. रणधीर शिंदे यांनी आपल्या मनोगतात शिवाजी विद्यापीठातील पूर्व संशोधनाचा आढावा घेतला. सशोधनाची परंपरा सांगितली. तर प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांनी या कार्यशाळेमागची भूमिका मांडली. ते आपल्या
मनोगतामध्ये म्हणाले की, संशोधनात संख्यात्मक दर्जापेक्षा गुणात्मक दर्जा वाढला पाहिजे. तसेच त्यांनी आजच्या संशोधनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
दिवसभर चाललेल्या कार्यशाळेमध्ये डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. अनिल गवळी, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. गोमटेश्वर पाटील या मार्गदर्शक वक्त्यांनी संशोधनाची दृष्टी विविध परिप्रेक्ष्य, संशोधनाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप, प्रबंध मांडणीः शिस्त आणि नैतिकता, प्रबंधविषयः जबाबदारी आणि आवश्यक काळजी, संशोधनसाधने वापरण्याचे कौशल्य या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालयातील दोनशेहून अधिक पीएच.डी. मार्गदर्शक आणि संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन भक्ती नाईक तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले.