
no images were found
अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस आणि स्पार्टन यांच्यात भागीदारी
अहमदाबाद, – भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस ने स्पार्टन (डीलियन स्प्रिंग्स एलएलसी) या एल्बिट सिस्टिम्सच्या समूह कंपनीसोबत एक बंधनकारक सहकार्य करार केला आहे. स्पार्टन ही ऍडव्हान्स अँटी सबमरीन वॉरफेयर सिस्टीम पुरविणारी एक अग्रणी कंपनी आहे. ही भागीदारी भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणि ऍडव्हान्स अँटी सबमरीन वॉरफेयर(एएसडब्ल्यू) सोल्युशनचे स्थानिकीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या सहकार्यामुळे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील पहिली खासगी कंपनी बनली आहे जी स्थानिक पातळीवर विकसित केलेले सोनोबॉय सोल्यूशन्स देणार आहे. हे कंपनीचे देशाच्या आत्मनिर्भर उद्दिष्टाप्रती असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. या भागीदारीत स्पार्टनची अग्रगण्य एएसडब्ल्यू टेक्नॉलॉजी आणि अदानी डिफेन्सची भारतीय नौदलाप्रति असलेली डेव्हलपमेंट, मॅनुफॅक्चरिंग आणि सस्टेनन्सची एक्सपर्टरीज एकत्र येणार आहे.
सोनोबॉयज हे पाण्याखालील क्षेत्रातील जागरूकता (अंडर सी डोमेन अवेयरनेस – युडीए) वाढवण्यासाठी अत्यावश्यक उपकरणे आहेत, जे पाणबुडी आणि इतर पाण्याखालील धोक्यांचा शोध घेणे, त्यांचे स्थान निश्चित करणे आणि त्यावर लक्ष ठेवणे यासाठी प्रभावी उपाययोजना देतात. हे एएसडब्ल्यू आणि इतर नौदल ऑपरेशन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, नौदल सुरक्षा राखण्यासाठी आणि नौदलाच्या कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचे रक्षण करण्यासाठी मदत करतात.
मागील अनेक दशकांपासून भारत ही अत्यावश्यक नौदल क्षमता आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात करत होता, ज्यामुळे विदेशी कंपन्यांवर अवलंबित्व वाढले होते. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांनुसार, स्पार्टनचे भारतीय नौदलासोबत सुरु असलेले संबंध आता अदानी डिफेन्सला हे सोल्यूशन्स भारतातच तयार करण्यास आणि भारतासाठीच बनवण्यास मदत करणार आहेत.
अदानी एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष जीत अदानी म्हणाले, “सतत अस्थिर होत असलेल्या सागरी परिस्थितीत, भारताची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता बळकट करणे हे केवळ एक धोरणात्मक प्राधान्य नसून, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. भारतीय नौदलाला इंटिग्रेटेड, मिशन-रेडी आयएसआर (इंटीलिजन्स, सर्व्हेलन्स अँड रिकॉन्सन्स) आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता हवी आहे, ज्यामध्ये सोनोबॉयसारख्या महत्त्वपूर्ण प्रणालींचा समावेश आहे — ज्या स्वदेशी विकसित, तातडीने तैनात करता येणाऱ्या आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असतात. स्पार्टनसोबतच्या या भागीदारीद्वारे, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील पहिली खासगी कंपनी बनली आहे जी स्वदेशी सोनोबॉय सोल्यूशन्स उपलब्ध करून देईल, जे प्रगत तंत्रज्ञानापर्यंत प्रवेश देतात आणि भविष्यकालीन, आत्मनिर्भर संरक्षण व्यवस्थेची उभारणी करतात. हे पाऊल भारतासाठी, भारतात आणि जगासाठी – जागतिक दर्जाच्या क्षमतांनी सुसज्ज अशी आपली संरक्षण यंत्रणा तयार करण्याच्या अदानी समूहाच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.”
अदानी डिफेन्स आणि एरोस्पेसचे सीईओ आशीष राजवंशी म्हणाले, “मागील अनेक दशकांपासून भारत अशा अत्यावश्यक तंत्रज्ञानासाठी आयातीवर अवलंबून होता. जागतिक दर्जाच्या सोनोबॉय टेक्नॉलॉजीला भारताच्या संरक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी ही भागीदारी या महत्त्वपूर्ण क्षेत्रात आत्मनिर्भर क्षमता उभारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.”
स्पार्टन डेलीऑन स्प्रिंग्स एलएलसीचे अध्यक्ष आणि सीईओ डॉनेली बोहान म्हणाले, “स्पार्टनला समस्या निराकरण, प्रगत अभियांत्रिकी आणि अमेरिकेच्या सर्वोत्तम सागरी संरक्षण उपाययोजना तयार करण्याचा प्रदीर्घ वारसा लाभला आहे. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेससोबत भागीदारी करून आम्हाला आमचे सिद्ध झालेली एएसडब्ल्यू टेक्नॉलॉजी भारतात आणताना आनंद होत आहे. ही भागीदारी आम्हाला स्थानिक स्तरावर असेंबलेजचे स्थानिकीकरण करण्यास, उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य निर्माण करण्यास आणि भारतीय नौदलाच्या गरजेनुसार विश्वासार्ह एएसडब्ल्यू सोल्यूशन्स पुरवण्यासाठी सक्षम करेल.”