Home सामाजिक इन्फोसिस फाऊंडेशनकडून आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची केली घोषणा

इन्फोसिस फाऊंडेशनकडून आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची केली घोषणा

11 second read
0
0
9

no images were found

इन्फोसिस फाऊंडेशनकडून आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची केली घोषणा

 

 

 कोल्हापूर ,: इन्फोसिस फाऊंडेशन या इन्फोसिसच्या परोपकार आणि सीएसआर विभागाने आपल्या आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. भारतात सामाजिक नवचैतन्याला चालना देण्याप्रति आपली वचनबद्धता स्पष्ट करताना इन्फोसिस फाऊंडेशन या पुरस्कारांत सहभागी होण्यासाठी देशभरातील नवप्रवर्तक आणि सामाजिक उद्योजकांना आमंत्रित करत आहे.

     आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्स २०२५ चे उद्दिष्ट भारतातील वंचित समुदायांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या अद्वितीय तंत्रज्ञान-आधारित उपायांचा विकास करणाऱ्या व्यक्ती, संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उपक्रमांचा गौरव करून पारितोषिक देण्याचा आहे. इन्फोसिस फाउंडेशन प्रत्येक विजेत्याला ५० लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचे वचन देते. त्याची एकूण बक्षीस रक्कम २ कोटी रुपयांची आहे.

 आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्स २०२५ मध्ये शिक्षण, आरोग्यसेवा ,पर्यावरणीय शाश्वतता  या  तीन श्रेणींमध्ये अर्ज  १५ जून पर्यंत स्वीकारले जातील. १८ वर्षे वयावरील भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशिका खुल्या आहेत. सहभागी व्हिडिओजच्या स्वरूपात आपल्या कामाचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या प्रवेशिका दाखल करू शकतात. ते आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड्सच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. आणि  प्रवेशिका पूर्णपणे कार्यरत प्रोटोटाइप किंवा पूर्ण झालेला प्रकल्प असावा. ती फक्त एक संकल्पना, कल्पना किंवा माहिती नसावी.

 अंतिम विजेते निश्चित करण्यासाठी प्रतिष्ठित परीक्षकांचे एक पॅनेल निवडलेल्या सहभागींचे मूल्यांकन करेल. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हाप…