Home गौरव सन्मान डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम

डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम

32 second read
0
0
9

no images were found

डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिमाचल प्रदेश येथे  झालेल्या संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरने  प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश मिळवले आहे. या स्पर्धेत विद्यापीठाच्या ‘डेंग्यू डिटेक्टर’ ला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

       सोलन मधील शूलिनी विद्यापीठ येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी  आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धा संपन्न झाली. देशाच्या विविध विभागांमधून निवडलेल्या १२ संघांमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत हे यश मिळवले.

      यामध्ये विद्यापीठाच्या संशोधकांनी सादर केलेल्या ‘डेंग्यू डिटेक्टर’ प्रोजेक्टला प्रथम क्रमांक क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. मेडिकल बायोटेक्नोलॉजी विभागातील पीएचडी संशोधक कु. सुस्मिता सतीश पाटील व कु. मयुरी महादेव घाटगे यांनी कागदाधारित नॅनोकॉम्पोझिटवर आधारित इलेक्ट्रोकेमिकल बायोसेंसर विकसित केला आहे. हा सेन्सर कमी खर्चिक, जलद व उच्च संवेदनशीलतेने एन.एस. 1 अँटिजन ओळखू शकतो. त्यामुळे डेंग्यूचे वेळेवर निदान होऊन गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होईल. या प्रकल्पाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून  ७५ हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या संशोधकाना प्रा. डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. 

       त्याचबरोबर   स्टेम सेल अँड रिजनरेटिव मेडिसिन विभागातील पीएचडी संशोधक कु. हर्षदा लोखंडे व कु. प्रिया वाडकर यांनी सादर केलेल्या  “एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स कॉम्पोझिट बायोइंक फॉर थ्री-डी बायोप्रिंटिंग ऑफ स्मॉल डायामीटर व्हॅस्क्युलर ग्राफ्ट्स” या प्रकल्पाला  द्वितीय क्रमांक मिळाला असून रु. ५० हजार पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संशोधन केले. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात कृत्रिम रक्तवाहिन्या अधिक जैवसुसंगत व कार्यक्षम पद्धतीने तयार करता येतील.  या संशोधनाला डॉ. मेघनाद जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

      गुजरातमधील वल्लभ विद्यानगर येथील  सरदार पटेल विद्यापीठात झालेल्या अन्वेषण वेस्ट झोन स्पर्धेत याच दोन प्रकल्पांना अनुक्रमे पहिला  व दुसरा  क्रमांक प्राप्त झाला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेश येथील स्पर्धेतही विद्यार्थ्यानी हे यश कायम राखले  आहे. 

      या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…