Home उद्योग ट्रायडंट ग्रूपची भारतभरातील भरती मोहिमेसह विकसित भारत मिशनसोबत वाटचाल

ट्रायडंट ग्रूपची भारतभरातील भरती मोहिमेसह विकसित भारत मिशनसोबत वाटचाल

1 second read
0
0
14

no images were found

ट्रायडंट ग्रूपची भारतभरातील भरती मोहिमेसह विकसित भारत मिशनसोबत वाटचाल :रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि राष्ट्र उभारणीवर सातत्याने भर देणाऱ्या या ग्रूपतर्फे ३००० हून अधिक कर्मयोगींची नियुक्ती होणार

कोल्हापूर(प्रतिनिधी):–ट्रायडंट लिमिटेड ही ट्रायडंट ग्रूपची मुख्य कंपनी आणि भाारतातील एक आघाडीचा उद्योग समूह आहे. या कंपनीने आपल्या उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरतीची प्रक्रिया जाहीर केली असून यातून ३००० हून अधिक कर्मयोगींना कामावर घेतले जाणार आहे. कापड उत्पादन क्षेत्रात कौशल्य विकासाला बळकटी आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या राष्ट्रीय धोरणाला अनुसरून ही भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
या घोषणेबद्दल ट्रायडंट ग्रूपच्या ग्रूप सीएचआरओ पूजा बी. लुथ्रा म्हणाल्या, “ट्रायडंटमध्ये आमचा ठाम विश्वास आहे की भारताच्या उत्पादन क्षेत्रातील बदलांचा पाया प्रतिभावान मनुष्यबळात आहे. या मोठ्या प्रमाणावरील भरती प्रक्रिया मोहिमेद्वारे आम्ही आमच्या मनुष्यबळाला बळकटी देत आहोत आणि त्याचवेळी लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज उत्पादन परिसंस्था निर्माण करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला हातभार लावत आहोत. व्यवसायवृद्धीपलिकडे दीर्घकालीन करिअर जोपासणे, समुदायांना बळकटी देणे आणि जागतिक उत्पादन नेतृत्व बनण्याच्या भारताच्या प्रवासात अर्थपूर्ण साह्य देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.”
या उपक्रमाचा भाग म्हणून ऑपरेटर, विणकर, शिवणकाम कारागीर, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि इतर कौशल्यांसोबतच विविध तांत्रिक आणि कार्यचलन जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव याआधारे निवड केली जाईल. विविध कौशल्य पात्रता आणि अनुभव यासाठी साजेशी अशी मानधन रचना ट्रायडंटने केली आहे. २-३ वर्षांपर्यंतचा अनुभव असणाऱ्या प्रोफेशनल्सना मासिक २५००० रु. मानधन दिले जाईल. तीन ते पाच वर्षांपर्यंतच्या अनुभवासाठी मासिक ३६००० रु. तर पाच ते सात वर्षांचा तज्ज्ञ अनुभव असलेल्यांना मासिक ५०००० रु. मानधन दिले जाणार आहे.
या स्पर्धात्मक पगारासोबतच कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह्स म्हणजे कामातील उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहने, व्हेरिएबल पे, रचनात्मक शिक्षण आणि विकास कार्यक्रम, मोफत हॉस्टेल, कमी दरातील खाद्यपदार्थ, क्रीडा आणि जीम सुविधांची सोय, वैद्यकीय साह्य, प्रॉव्हिडंट फंड आणि ईएसआय सुविधा तसेच विशिष्ट कालावधीने बक्षीस आणि सन्मान असे फायदेही कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ट्रायडंटने आपल्या धोरणात्मक प्रगतीचा मूळ भाग म्हणून मनुष्यबळातील गुंतवणूक कायम राखली आहे. सर्वसमावेशक प्रगती, आपल्या उत्पादन क्षमतांना बळकटी देणे आणि त्याचवेळी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा आणि करिअरमधील प्रगतीचाा मार्ग आखणे ही बांधिलकी या ग्रूपने कायम जपली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम

डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम कोल्हाप…