Home धार्मिक हिंदु जनजागृती समितीचे कार्य यशस्वी होईल आणि कार्याला गती येईल ! – पू. भगवान डोणे महाराज

हिंदु जनजागृती समितीचे कार्य यशस्वी होईल आणि कार्याला गती येईल ! – पू. भगवान डोणे महाराज

2 second read
0
0
16

no images were found

हिंदु जनजागृती समितीचे कार्य यशस्वी होईल आणि कार्याला गती येईल ! – पू. भगवान डोणे महाराज

हुपरी – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्मजागृतीचे जे कार्य चालू आहे ते कार्य यशस्वी होईल. हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आमचा आशीर्वाद आहे. या कार्याला आता गती येईल, असा आशीर्वाद हालसिद्धयात्रेत भाकणूक करणारे पू. भगवान डोणे महाराज यांनी दिला. रविवार, १ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पू. भगवान डोणेमहाराज यांची भेट घेऊन त्यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले, तसेच सभेच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.|

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी शाल आणि श्रीफळ देऊन पू. भगवान डोणेमहाराज यांचा सन्मान केला. या वेळी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे, कु. प्रतिभा तावरे यांसह अन्य उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…