
no images were found
भगवान महावीर अध्यासनास श्री अशोक चौगुले यांची बृहत देणगी
श्री अशोक चौगुले यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी दहा हजार रु. (10,000) अशी बृहत देणगी भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विंजय ककडे यांचेकडे सुपूर्द केली.
भोसे, (सांगली) चे सुपुत्रश्री अशोक चौगुले हेश्रीमती कस्तुरबा वालचंद कॉलेज मधून 2009 साली सूपरवायजर ऑफ जुनीयर विंग या पदावरून निवृत्त झाले, श्री अशोक चौगुले सध्या दक्षिण भारत जैन सभेच्या ग्रॅजुएट असोसिएशन चे क्रियाशील कार्यकर्ते आहेत, त्यांची पत्नी सौ. सुनंदा चौगुले याच कॉलेज मधून निवृत्त झाल्या आहेत. श्री अशोक चौगुले यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र ह्या विषयांचे शिक्षक म्हणून काम केले असूनत्यांनीविविधसमाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस(100 %) पात्र आहे.