
no images were found
माँ साहेब कशा गेल्या? जाहीरसभा घेऊन सगळ्याच गोष्टी उघड करू : निलेश राणे
रत्नागिरी : आमच्या नादाला लागू नका, उगाच फाटक्यात पाय घालू नका. ठाकरे उगाच वायफळ बोलत बसले, तर ऐश्वर्या ठाकरे कोण? सोनू निगम काय करत होता, या सगळ्या गोष्टी बाहेर निघणार हे ठाकरेंनी लक्षात ठेवावं. जाहिरपणे सभा घेऊन सगळ्याच गोष्टी उघड करू, असा थेट इशाराच भाजप प्रदेश सचिव आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना निलेश राणेंनी हा इशारा दिला.
महाराष्ट्राला काही गोष्टी कळल्या पाहिजेत यासाठी मी एक ट्विट केलं आहे. कधीकधी असे प्रसंग येतात की बोलल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, असेही निलेश राणे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे आमच्या राणेंच्या नादाला तर लागायचेच नाही हे लक्षात ठेवा. आणि आमच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याना आवरा, असा आणखी एक इशारा त्यांनी यावेळी दिला. चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा ठाकरे कुटुंबातील कुठल्या सुंदर व्यक्तीमुळे मर्डर झाला, हे महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे.
माँ साहेब जेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसवर गेल्या, कुठल्या परिस्थितीत गेल्या, का गेल्या? तेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसवर कोण का नव्हतं हे एकदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे. फौजफाटा असणारे ठाकरे आणि अचानकपणे तिथे औषध द्यायला कोणी नाही, असं कधी घडू शकतं का? असे अनेक सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर येत्या काळात आता ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहयला मिळू शकतो. निलेश राणे यांच्या टीकेला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ठाकरेंनी फाटक्यात पाय घालू नये, एवढे फाडले जाल की शिवायला कोणी येणार नाही. ठाकरेंनी त्यांची औकात ओळखावी ते शून्य झालेले आहेत. त्यांना कोण कुत्रंही विचारत नाही, अशी जहरी टीका राणे यांनी केली आहे.