Home Video कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत, 

कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत, 

12 second read
0
0
51

no images were found

कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत, 

कोल्हापूर (प्रतिनिधी):भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक येथे प्रचंड गर्दी झाली होती. महाराणी ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत भव्य रॅली काढून कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे फोटो असलेले फलक आणि भाजपाचा ध्वज हातात घेतलेल्या तरूणाईमध्ये सळसळता उत्साह होता. पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपाशी जोडण्यात येईल आणि भाजप युवा मोर्चाचे संघटन राज्यात मजबुत करणार असल्याचे युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नमुद केले. रॅलीनंतर भाजप जिल्हा कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्हयातील कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती.

युथ आयकॉन आणि कोल्हापूरचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली आहे. राज्यस्तरावरील प्रदेशाध्यक्षासारखं महत्वाचे पद कोल्हापुरला मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे आज दुपारपासून भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईचे जथ्थे ताराराणी चौकाच्या दिशेने येत होते. छत्रपती ताराराणी चौक कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. सायंकाळी पाच वाजता कृष्णराज महाडिक यांचे छत्रपती ताराराणी चौकात आगमन झाले. महापौर रूपाराणी निकम यांनी कृष्णराज महाडिक यांचे स्वागत केले. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळयाला अभिवादन करून, रॅलीला सुरवात झाली. सजवलेल्या वाहनावर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. भाजपचे ध्वज आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो असलेले फलक हातात घेवून भाजप आणि कृष्णराज महाडिक यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बी न्यूज कॉर्नर मार्गे रॅली व्हिनस कॉर्नर चौकात आली. याठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयाला फुलं अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आईसाहेब महाराज पुतळा मार्गे ही रॅली बिंदू चौकात आली. बिंदू चौकातील शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी कृष्णराज महाडिक यांचे औक्षण केले. तसेच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीत चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा कारखान्याचे चेअरमन विश्‍वराज महाडिक, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, देवराज बारदेस्कर, महेश पाटील, चंद्रकांत घाटगे, संग्राम निकम,  महेश वासुदेव, राजसिंह शेळके यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी तसंच युवा मोर्चाचे राज्यभरातील आणि जिल्हयातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…