Home मनोरंजन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल -सत्र 13 ला मिळाले आपले सर्वोत्तम 12 स्पर्धक!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल -सत्र 13 ला मिळाले आपले सर्वोत्तम 12 स्पर्धक!

9 second read
0
0
49

no images were found

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल -सत्र 13 ला मिळाले आपले सर्वोत्तम 12 स्पर्धक!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल – सत्र 13 दर आठवड्याला उत्तमोत्तम परफॉर्मन्स सादर करून मौसम म्युझिकाना करत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. या शोचे परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया तसेच प्रेक्षकांसमोर आणि आमंत्रित मान्यवर पाहुण्यांच्या समक्ष आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करणार्‍या स्पर्धकांमधून आता दोन महिन्यांनंतर सर्वोत्तम 12 स्पर्धक या स्पर्धेत राहिले आहेत. हे स्पर्धक आहेत – अयोध्येचा ऋषी सिंह, कोलकाताचे बिदीप्ता चक्रवर्ती, अनुष्का पात्रा, देबोस्मिता रॉय, सोनाक्षी कर, सेंजुती दास, जम्मूचा चिराग कोतवाल, लखनौचा विनीत सिंह, अमृतसरच नवदीप वडाली आणि रूपम भरनारिया आणि गुजरातचे शिवम सिंह आणि काव्या लिमये. एकापेक्षा सरस परफॉर्म करत या 12 स्पर्धकांनी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे.

इंडियन आयडॉलच्या मंचावर देशाच्या काना-कोपर्‍यातून असामान्य प्रतिभेचे धनी असणारे स्पर्धक आले आहेत. या स्पर्धकांविषयी सांगायचे तर, ऋषी सिंह आपल्या हृदयस्पर्शी आवाजाबद्दल ओळखला जातो. त्याने केवळ सगळ्या प्रेक्षकांचे नाही तर प्रख्यात क्रिकेटर विराट कोहलीचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. विराट कोहलीने स्वतः एक संदेश लिहून ऋषीचे कौतुक केले आहे. साधेपणा आणि आपल्या आईविषयीचे अपार प्रेम याबद्दल ओळखल्या जाणार्‍या बडोद्याच्या शिवम सिंह म्हणजे ‘पापा शिवम’चा आवाज थेट प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडतो. तो उत्तम गायक तर आहेच पण या शो मध्ये आलेल्या विविध अभिनेत्री- शर्मिला, टागोर, झिनत अमान, तनुजा, कृती सॅनन या सर्वांसोबत त्याने डान्स देखील केला आहे, जो खरोखर नेत्रसुखद होता. कोलकाताची सेंजुती दास अगदी ऑडिशन फेरीपासूनच तिच्या पारंपरिक शैलीमुळे आणि गोड आवाजामुळे सगळ्यांची लाडकी आणि आकर्षणाचे केंद्र बनली आहे. ज्यावेळी निर्माता विपुल शाहने आपल्या चित्रपटातील एक गाणे सेंजुतीला तिच्या आवाजात गाण्याची ऑफर दिली, त्यानंतर तर तिचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. ‘पढाकू बच्ची’ अनुष्का पात्रा सेटवर शांत शांत राहणारी मुलगी आहे. या शो मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स देऊन ती आपली गुणवत्ता दाखवून देत आहे आणि परीक्षकांना आश्चर्याचे धक्के देत आहे. अमिताभ बच्चन असो की सलमान खान, ती त्यांचा अवतार अगदी छान निभावते. ‘बंगाली ब्यूटी’ बिदीप्ता दासने आपल्या परफॉर्मन्सने परीक्षक, अनेक पाहुणे कलाकार आणि प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. इतकेच नाही, तर इंडियन आयडॉलच्या या मंचावरून तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत. अनुपम खेरने तिला आपल्या अॅक्टिंग स्कूलमध्ये शिष्यवृत्ती देऊ केली आहे. देबोस्मिता रॉय आणि सोनाक्षी कर या कोलकाताहून आलेल्या दोघी मुलींनी आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर टॉप 12 मध्ये जागा मिळवली आहे. देबोस्मिता रॉयचा वाढदिवस धडाक्यात साजरा करताना तिच्या 21व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या सर्व सह-स्पर्धकांनी तिला एक सोन्याची चेन भेट दिली.

एकामागून एक अप्रतिम परफॉर्मन्स देणार्‍या फॅशनिस्टा काव्या लिमयेने आपल्या चतुरस्त्र गयाकीने परीक्षकांना प्रभावित केले आहे. सचिन लिमये या प्रसिद्ध गायकाची मुलगी असलेल्या काव्याने या शो ला एक टवटवीत आवाज दिला आहे आणि नेहमी प्रेक्षकांना चकित केले आहे. यात भर म्हणजे, या शोमधल्या स्पर्धकांना नेहमी प्रोत्साहन देणार्‍या हिमेश रेशमियाने अलीकडेच काव्या लिमये आणि तिच्या आईला आपल्या आगामी म्युझिक आल्बममध्ये एक गाणे देऊ करून विशेष भेट दिली आहे. अमृतसरचा पंजाबी मुंडा नवदीप वडाली हा वडाली बंधूंच्या कुटुंबातला आहे. आपल्या कव्वाली आणि सूफी शैलीच्या गाण्यांनी त्याने प्रत्येकवेळी परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणखी एक म्हणजे, ‘दुसरी संधी’चे उदाहरण घालून देणारा विनीत सिंह एक दमदार स्पर्धक आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्यानंतर देखील त्याने या शोमधली आपली उपस्थिती सुनिश्चित केली आहे. या 12 स्पर्धकांचा प्रवास बघणे रोचक असणार आहे. इंडियन आयडॉल 13 च्या मंचावर उत्कृष्ट परफॉर्म करण्याचा प्रयत्न ते करतील, त्यामुळे ‘फिर साथ आने का बहाना है, अब मौसम म्युझिकाना है.’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान योजना लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार संपन्न.             

पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान योजना लोकार्पण सोहळा आर…