Home शासकीय तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

6 second read
0
0
161

no images were found

तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती व्हावी यासाठी जास्तीत-जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण  विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियमानुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टल (National Portal For Transgender Persons) वर भेट देवून ॲप्लाय ऑनलाईन यावर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. तसेच ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करावीत.

अधिक माहितीकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्प‍िटल शेजारी कोल्हापूर येथे ०२३१- २६५१३१८ वर संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…