no images were found
ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेले उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र
कोल्हापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर केला नाही, अशी व्यक्ती राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पाच वर्षांच्या कालावधीकरीता पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असेल. निरर्ह उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ब) (1) अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा व करवीर तालुक्यातील एकूण 446 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अनर्ह ठरविण्यात आले आहे. अनर्ह उमेदवारांची माहिती शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ, पुणे विभाग, पुणे असाधारण क्रमांक 5 दिनांक 24/01/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.