
no images were found
नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम कोर्टाच्या आदेशानंतर पडण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रकरण कोर्टात गेले होते.
कोर्टाच्या आदेशानंतर राण यांचेकडून अनधिकृत बांधकामाचे पाडकामास सुरूवात करण्यात आलीय. मुंबईत जुहू येथे नारायण राणे यांचा ८ मजली ‘अधीश’ बंगला आहे. संतोष दौंडकर यांनी राणेंच्या अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती. मंजूर आराखड्याहून अधिक तीनपट म्हणजे सुमारे 2244 चौरस फुट बांधकाम केले असल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. महापालिकेच्या पथकाकडून बंगल्याची पाहणी करण्यात आलेली होती.
दरम्यान यासंबंधी कोर्टाच्या आदेशानंतर नारायण राणे यांनी त्यांच्या आधीश बंगल्यावरील अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवण्यास प्रारंभ केला आहे. साधारण आठवडाभरात अनधिकृत बांधकामाचा भाग हटवून नकाशाप्रमाणे नियमात बांधकाम ठेवले जाईल.