Home क्राईम तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास

3 second read
0
0
149

no images were found

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास  

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.कोल्हापुरातील ब्रोंद्रे नगरमधील ही घटना आहे. नकुशा साऊ बोडेकर असं या आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी तिनं एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्रास देणाऱ्या तरुणाला सोडू नका, त्याला फाशीची शिक्षा द्या असं या तरुणीनं म्हटलं आहे. त्यामुळे आता त्या तरुणाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नकुशाच्या घरच्यांनी मांडली आहे.

दहावी झाल्यानंतर नकुशा घरकाम करुन कुटुंबाला हातभार लावत होती. काही दिवसांपूर्वी ती आपल्या नातेवाईकांकडे बोंद्रेनगरला आली होती. १५ मार्च रोजी ती घरात एकटी होती. तेव्हा तिने छताला लटकून गळफास घेत आत्महत्या केली. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी कडी तोडून दरवाजा उघडल्यावर हा प्रकार लक्षात आला.

“मी एका मुलामुळे जीव देत आहे. बोंद्रेनगरमध्ये राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारेन अशी धमकी मला त्याने दिली आहे. तो मला सुखाने जगू देणार नाही. म्हणूनच मी जीव देत आहे. आई-नाना सॉरी. त्याला माफ करु नका. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या, तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल.”

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…