no images were found
महापालिका कर्मचारी आजपासून कामावर हजर
कोल्हापूर : जुन्या पेन्शन संदर्भात संपावर गेलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनला दिलं आहे.त्यामुळे राज्यभरातील महापालिकेतील कर्मचारी आजपासून राज्यव्यापी संपातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर मनपाकर्मचारी आजपासून कामावर रुजू होणार आहेत.
मात्र ते काळ्याफिती लावून काम सुरु करतील, असे पत्र फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे आम्हीही कामावर रुजू होऊ, अशी माहिती कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुंद्रे, सरचिटणीस दिनकर आवळे, अजित तिवले यांनी दिली आहे.