no images were found
राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई
कोल्हापूर : शहरातील राजेंद्रनगर व मोतीनगर या परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन, विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी व उपद्रव शोध पथकाने अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली. राजेंद्रनगर व मोतीनगर या परिसरात कारवाईवेळी 3 केबीन व 2 शेडवर कारवाई करुन हटविण्यात आले. शहरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता अरुणकुमार गवळी, कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे, प्रिया पाटील, चेतन आरमाळ, सर्व्हेअर शाम शेटे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत यांच्यासह अतिक्रमण, विभागीय कार्यालय क्रं.3 कडील कर्मचारी, राजारामपूरी पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि उपद्रव शोध पथकातील जवानांनी ही कारवाई केली.
तरी शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, रस्त्यांवर उभारलेले अनधिकृत शेड्स आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे.