Home Uncategorized अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड;

अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड;

32 second read
0
0
6

no images were found

अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगी

 कोल्हापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात व जिल्ह्यात फटाक्यांची विक्री करताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. फटाके हे अतिज्वलनशील व विस्फोटक स्वरूपाचे असल्याने अनधिकृतपणे फटाका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच संबंधित फटाके जप्त करण्यात येणार असल्याची सूचना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

                 शहर व सलग्न ग्रामीण परिसरात दिवसेंदिवस आग व आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच नुकतीच हिंगोली शहरातील फटाका दुकानाला आग लागून जीवित व वित्तहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी दिवाळी सणासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. फटाका विक्री करताना मा. उच्च न्यायालयाचे आदेश, नगरविकास विभाग तसेच गृह विभागाच्या सूचनांनुसार आणि विस्फोटक नियम २००८, पर्यावरणविषयक नियम व इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे.

                 मा. उच्च न्यायालयाने दि. १७ व २५ ऑक्टोबर २०१६ रोजी दिलेले आदेश आणि शासन निर्णय दि. ११ मे २०१६ अन्वये फटाक्यांची विक्री व वापरासाठी स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने आगामी दिवाळीसाठी किरकोळ फटाका विक्रीचे स्टॉल लावण्याकरिता निश्चित जागा ठरविल्या आहेत. या निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त शहरात अन्यत्र फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली जाणार नाही.

                 त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व नागरिक, परवानाधारक फटाका विक्रेते, व्यापारी व संबंधित घटकांनी नियमांचे पालन करावे. अनधिकृतपणे फटाका विक्री करणाऱ्या व्यक्ती व घटकांवर विस्फोटक नियम तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमातील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल. यामध्ये २ हजार रुपये दंड आकारणी व फटाके जप्त करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवा …