Home उद्योग एंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला

एंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला

1 second read
0
0
5

no images were found

एंटाला इंडस्ट्रीजचा ₹२३.३३ कोटींचा आयपीओ २९ ऑक्टोबरपासून खुला : पहिल्या सहामाहीत ₹३०.११ कोटी महसूल, ₹४.१९ कोटी निव्वळ नफा

कोल्हापूर : एंटाला इंडस्ट्रीज लिमिटेडचा ₹२३.३३ कोटींचा आयjपीओ २९ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होणार असून, २ नोव्हेंबर रोजी बंद होईल. कंपनीने प्रति शेअर ₹६३ ते ₹६७ असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. या आयपीओद्वारे कंपनी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहे.
३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या सहामाहीत कंपनीने ₹३०.११ कोटी महसूल, ₹५.७६ कोटी ईबीआयटीडीए आणि ₹४.१९ कोटी करानंतरचा नफा नोंदवला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा महसूल ₹४७.४० कोटी, तर निव्वळ नफा ₹४.२४ कोटी होता.
गुजरातमधील राजकोट येथे मुख्यालय असलेली एंटाला इंडस्ट्रीज बीओपीपी लॅमिनेटेड पिशव्या, पीपी विणलेल्या पिशव्या आणि विविध पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन करते. अन्न प्रक्रिया, कृषी, खते, रसायने आणि बांधकाम क्षेत्रांना कंपनी सेवा पुरवते.
आयपीओतून उभारण्यात येणारा निधी खेळत्या भांडवलाची गरज, यंत्रसामग्रीवरील खर्च आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाणार आहे. शेअर्सचे वाटप ३ नोव्हेंबरला, तर संभाव्य सूचीकरण ५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…