no images were found
पी अँड जी लूप – द क्रिएटर कलेक्टिव्ह पी अँड जी इंडियाचे ब्रँड्स एका अभूतपूर्व रूपात एकत्र आणत आहे.
मुंबई,: पी अँड जी इंडियाने आज पी अँड जी लूप – द क्रिएटर कलेक्टिव्ह सादर करत भारतातील त्यांचे विविध श्रेणींतील ब्रँड्स पहिल्यांदाच एकत्र आणले आहेत. मुंबईतील डोम @ एनएससीआय एसव्हीपी येथे आयोजित हा दोन दिवसांचा कार्यक्रम हजारो निर्माते आणि सांस्कृतिक कलाकारांना त्याच्यासह सहभागी होणा र्या पी अँड जी चे ग्लोबल आणि भारतातील नेते, शास्त्रज्ञ, ब्रँड ऍम्बेसेडर्स आणि भागीदारही एकत्र आणत आहे. या कार्यक्रमातून उत्पदनांमागील विज्ञान, ग्राहक अंतर्दृष्टी आणि नवसंशोधनाचा एक अनोखा अनुभव मिळणार आहे.
पी अँड जी मध्ये, नवसंशोधनाची सुरुवात ग्राहक आणि त्यांच्या बदलत्या गरजांना खोलवर समजून घेण्यापासून होते. ‘ग्राहक प्रथम’ या विश्वासाद्वारे मार्गदर्शित , पी अँड जी लूप निर्मात्यांना उत्पादनांमागील मागील विज्ञान आणि विचारसरणीशी जोडले जाण्याची नवीन संधी देत आहे. यामुळे उत्पादनांतील नवसंशोधन आणि त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत अधिक सोप्या आणि त्यांच्याशी ओळख पटणार्या पध्दतीने पोहोचण्यास मदत होईल. सर्वसमावेशक ब्रँड विश्व, तज्ज्ञांसोबत चर्चा, परस्परसंवादी मास्टरक्लासेस आणि सजीव प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, हा कार्यक्रम रोजच्या वापरातील उत्पादनांमागील कहाणी सजीव करतो.
हा कार्यक्रम पी अँड जी ची दिग्गज उत्पादने व त्यांच्या अलिकडच्या उत्पादनांवरही प्रकाश टाकतो. ग्राहकांना समजून घेणे, शास्त्रशुध्द कौशल्य आणि सततचे नवसंशोधन एकत्र येऊन लोकांच्या खऱ्या गरजा पूर्ण करणारी उत्पादनां कसे तयार होतात, हे यातून दाखवले जाते. पारंपरिक उत्पादन प्रदर्शनांच्या पलीकडे जाऊन, पी अँड जी लूप निर्मात्यांना एक संधी देतो. यातून ते रोजचे आयुष्य सुधारण्यावर आणि ग्राहकांच्या अपूर्ण गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ब्रँड्समागील संशोधन, सूत्रीकरण विज्ञान (फॉर्म्युलेशन विज्ञान) आणि त्यासाठी घेतलेली काळजी जाणून घेऊ शकतात.
कुमार वेंकटसुब्रमण्यन, सीईओ, पी अँड जी इंडिया, म्हणाले, “पी अँड जी मध्ये, नवसंशोधनाची सुरुवात ग्राहकांना सर्वांगाने व सखोल समजून घेण्यापासून आणि त्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतून होते. ‘ग्राहक प्रथम’ या आमच्या विश्वासाने मार्गदर्शित, आम्ही लोकांच्या रोजच्या जीवनात महत्त्वाचा बदल घडवून आणणाऱ्या नवसंशोधनांसाठी विज्ञान, संशोधन आणि ग्राहक अंतर्दृष्टींना सतत एकत्र आणतो. पी अँड जी लूप – द क्रिएटर कलेक्टिव्ह’च्या माध्यमातून, आम्ही भारतात पहिल्यांदाच आमचे सर्व ब्रँड्स एकत्र आणत आहोत. यामुळे निर्मात्यांना आमच्या उत्पादनांमागील विज्ञान आणि विचारसरणी प्रत्यक्ष अनुभवण्याची एक अनोखी संधी मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे की या संवादामुळे नवीन चर्चांना स्फुरण मिळेल, आमच्या नवसंशोधनांबद्दलची समज अधिक वाढेल आणि आमच्या ब्रँड्सचे महत्त्व ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचण्यास मदत होईल.”
या कार्यक्रमात पी अँड जी च्या ग्लोबल आणि भारतातील व्यवसायांमधील अनेक प्रमुख सहभागी झाले आहेत.यामध्ये फ्रेडी भरुचा,सीईओ – ब्यूटी, पी अँड जी; ओया ओंगोर, अध्यक्ष – आयमेटा; आणि डेव्हिड खू,प्रमुख वैज्ञानिक आणि पी अँड जी च्या सिंगापूर नवसंशोधन सेंटरमधील सायंटीफिक कम्युनिकेशन्सचे संचालक, तसेच पी अँड जी इंडियाचे नेतृत्व यांचा समावेश आहे. त्यांच्या सहभाग ग्राहकांना समजून घेणे, शास्त्रशुध्द नवसंशोधन आणि रोजच्या गरजांसाठी उत्पादने तयार करण्यामागील विचारसरणी यावर विविध दृष्टिकोन समोर आणत आहेत.
ब्रँड ऍम्बेसेडर्स रश्मिका मंदान्ना (व्हिस्पर), प्राजक्ता कोळी (व्हीनस) यांनी आपापल्या ब्रँड्सचा गाभा आणि ग्राहकांना दिलेली जीवनाशी संबंधित वचने सादर केली. त्यांनी उत्पादनाचे फायदे आणि ब्रँडची मूल्ये ग्राहकांना सहज समजतील अशा संवादात मांडले.