no images were found
जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका
कोल्हापूर : कोल्हापूरातील करवीर तालुक्यात एका डोंगरावर वसलेलं शिपेकरवाडी हे गाव. ५७ कुटुंबं असलेल्या या गावाला गेल्या वर्षीही भूस्खलनाचा सामना करावा लागला होता आणि आता ही भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. रोज येथील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळे भीतीच्या सावटाखाली राहत आहेत.
मुसळधार पाऊस सुरू झाला की राज्यातील अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढत असतो. नुकत्याच रायगडमध्ये इर्शाळवाडीची घटना असो किंवा माळीनची घटना, संपूर्ण गाव काही क्षणात ढिगार्याखाली दबला गेला आणि राहिले त्या फक्त आठवणी. इस्त्रोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या लँडस्लाईड ॲटलास अहवालात देशातील भूस्खलनाचा अधिक धोका असलेल्या आणि लोकसंख्येची प्रमाण जास्त असलेल्या १४७ जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केलीय. यामध्ये राज्यातील ११ जिल्हे असून यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.