
no images were found
मतदार जागृती अंतर्गत 9 हजार 500 विद्यार्थ्यांमार्फत भव्य मानवी रांगोळी
कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने मतदार जागृती (SVEEP) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका व जिल्हा परिषद मार्फत दिनांक 19 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता कोल्हापूर शहरातील 26 शाळांमधील 9 हजार 500 विद्यार्थ्यांची भव्य मानवी रांगोळीचे महात्मा गांधी मैदान, वरुणतीर्थ वेश, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नोडल ऑफिसर (SVEEP) तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उप निबंधक नीलकंठ करे यांनी दिली आहे.
महानगरपालिकेच्या ताराराणी सभागृहात प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी उपस्थित शाळा मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी नोडल ऑफिसर तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था नीलकंठ करे, सहाय्यक नोडल ऑफिसर तथा वित्त व लेखा अधिकारी वर्षा परीट, प्राथमिक शिक्षण समिती प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद दिगंबर मोरे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक उपस्थित होते.
मानवी रांगोळी संकल्पना –
26 शाळांमधील 9500 विद्यार्थ्यांचा सहभाग (शाळा, स्काउट गाईड, एनसीसी युनिफॉर्ममध्ये),विद्यार्थ्यांमार्फत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती पर घोषवाक्य, 50 कला शिक्षक, क्रीडा शिक्षकांमार्फत मानवी रांगोळीचे रेखाटन. उपक्रमाची एशियन पॅसिफिक बुक रेकॉर्डमध्ये नोंदणी करण्यासाठी प्रयत्न.