
no images were found
माहेरी जाणार नाही म्हणजे नाही .भारताने तुरुंगात टाकले तर तिथे राहीन -सीमा हैदर
नॉयडा : भारतीय अधिकाऱ्यांनी मला तुरुंगात टाकले तर मी तिथे राहीन. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाणार नाही, असे भारतात अवैधरित्या प्रवेश केलेल्या सीमा हैदरने शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. ती म्हणाली की, उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) बड्या अधिकाऱ्यांनी माझी दोन दिवस चौकशी केली. त्यांना माझ्यावर संशय होता. पण मी जीवनकहाणी तसेच भारतात कशा रितीने आले हे सारे न लपवता त्यांना सांगितले आहे.
सीमा हैदर म्हणाली की, मला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने खरी ओळख लपवून मला नेपाळमार्गे भारतात यावे लागले. मी हे सारे धाडस फक्त प्रेमासाठी केले आहे. तिने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून मी सचिन मीना याला आपला पती मानत असल्याने करवा चौथचे व्रत केले होते. पाकमध्ये असतानाही मी कुंकू लावत असे.