no images were found
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं 19 जणांचं पालकत्व, शिक्षणाचा खर्च उचलणार; नीलम गोऱ्हे यांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळगड दुर्घटनेतील 19 मुलांचं पालकत्त्व स्वीकारलं आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: करणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वत: ही माहिती दिली. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दुर्घटनेत बचावलेल्या मुलांचा सर्व्हे झाला असून आता महिलांचा सर्व्हे करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
नीलम गोऱ्हे आज सकाळीच इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील पीडितांशी संवाद साधला. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीरही दिला. यावेळी त्यांनी लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का ? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याची विचारणा केली. तसेच याबाबत या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही दिल्या.