no images were found
तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन -उद्धव ठाकरे
मी तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहील. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू. तुम्हाला पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेऊ, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे. इर्शाळगड दुर्घटनेतील पीडितांशी ते संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावात उद्धव ठाकरे आज पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते. दरवेळी अशा दुर्घटना घडत असतात. आपण फक्त धावतो. मी यात राजकारण करत नाही. पण राजकारण्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत. त्या डोंगर उतरावर किंवा डोंगराच्या खाली आहेत. तिथे कधीही दरडी कोसळू शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.