Home शासकीय ई सेवा केंद्र साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

ई सेवा केंद्र साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

3 second read
0
0
102

no images were found

ई सेवा केंद्र साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 कोल्हापूर  : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर मार्फत दोन दिवसीय ई सेवा केंद्र साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे दिनांक 23 व 24 जुलै रोजी आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांनी केले आहे.

कार्यशाळेमध्ये स्वतःचे ई सेवा केंद्र चालू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात येणार आहे. उदा. पॅन कार्ड सेवा नवीन व दुरुस्ती, लहान मुलांचे, विवाहानंतरचे पॅन कार्ड यासह भविष्य निर्वाह निधी, केवायसी-पीएफ ट्रान्सफर, कामगार कार्ड, ई श्रम कार्ड, इ गॅजेट्स (राजपत्र), शॉप अॅक्ट, फूड लायसन्स, मतदान सेवा, जीवन प्रमाणपत्र, उद्योग आधार, सातबारा ८ अ, प्रॉपर्टी कार्ड, अपंग प्रमाणपत्र, महावितरण-कनेक्शन अर्ज, रिचार्ज पॉईंट, डिश रिचार्ज, मोबाईल रिचार्ज विषयी परिपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह दिली जाईल.

कार्यशाळा पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…