Home राजकीय जरांगेंच्या मुद्द्यावरून महायुतीत वितुष्ट आणण्याचा विरोधकांचा कट-हेमंत पाटील

जरांगेंच्या मुद्द्यावरून महायुतीत वितुष्ट आणण्याचा विरोधकांचा कट-हेमंत पाटील

2 second read
0
0
27

no images were found

जरांगेंच्या मुद्द्यावरून महायुतीत वितुष्ट आणण्याचा विरोधकांचा कट-हेमंत पाटील : पक्षीय कुरघोडी करण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचा दावा 

पुणे,: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिपच्या वादावरून राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत वाद वाढवण्याचा कुटील प्रयत्न सुरू आहे. या राजकीय घडामोडींमागे विरोधी पक्षांचा मोठा राजकीय अजेंडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही,असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी रविवारी (ता.२५) केला.

महायुतीमध्ये भांडण लावून आगामी काळात स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. या ऑडिओ क्लिपमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील वातावरणाचा गैरफायदा विरोधक घेत आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील समन्वय बिघडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही राजकीय घटक पडद्यामागून सूत्रे हलवत आहेत, असा दावा देखील पाटील यांनी केला.  

जरांगे यांच्या आडून महायुतीच्या नेत्यांमध्ये कलह निर्माण करणे आणि दोन मोठ्या पक्षांमधील अंतर वाढवणे हा यामागचा मूळ हेतू आहे. विरोधकांकडे सध्या कुठलाही अजेंडा उरलेला नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले.

व्हायरल ऑडिओ क्लिपच्या वादानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जी वाकयुद्धे पाहायला मिळत आहेत, त्याला विरोधी पक्षांकडून हवा दिली जातेय. महायुतीचे प्रमुख घटक एकमेकांविरुद्ध षडयंत्र रचत आहेत, असा आभास निर्माण करून महायुतीची प्रतिमा मलिन केली जातेय. दोन्ही पक्षांतील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांना चिथावणी देऊन वक्तव्ये करायला लावणे आणि संवाद खंडित करणे हा मुख्य हेतू षडयंत्रामागे असू शकतो, असा दावा पाटील यांनी केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती कोल्हापूर,: – शिवाजी विद्यापीठात आज महर्षी …