Home राजकीय मनोज जरांगेंशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करा-हेंमत पाटील

मनोज जरांगेंशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करा-हेंमत पाटील

4 second read
0
0
7

no images were found

मनोज जरांगेंशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करा-हेंमत पाटील : ५०० कोटींचे सत्य बाहेर येणे आवश्यक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पुणे,: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून, समाजात गैरसमज पसरवणाऱ्या आणि बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील निवेदन सादर करणार असल्याचे पाटील यांनी शुक्रवारी (ता.२३) स्पष्ट केले. 
 
पाटील यांनी संबंधित ऑडिओ क्लिपमधील वक्तव्यांची सत्यता तपासण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून, त्यांनी केलेल्या कथित वक्तव्यांची वस्तुस्थिती स्पष्ट करावी तसेच या क्लिपची सत्यता समोर येणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले. क्लिपमधून ५०० कोटींच्या व्यवहाराचा दावा करण्यात आला आहे. या व्यवहाराचे सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. राज्यातील दोन सत्ताधारी पक्षांमध्ये वाद निर्माण करण्याचा खोडसाळपणा या क्लिप मधून करण्यात येतोय का? हे तपासण्यासाठी प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.
 
संबंधित ऑडिओ क्लिपमुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आणि गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून, मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजाच्या अपेक्षांवर परिणाम होऊ शकतो, असेही पाटील यांनी नमूद केले.
 
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळावी. तपासात कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या किंवा गैरसमज पसरवणाऱ्या प्रकरणांची सत्यता तपासून योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

महायुतीच्या उमेदवार सौ.स्मिता जाधव यांचा विजय निश्चित:आमदार राजेश क्षीरसागर.

महायुतीच्या उमेदवार सौ.स्मिता जाधव यांचा विजय निश्चित:आमदार राजेश क्षीरसागर. कोल्हापूर (प्…