no images were found
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रणाली बसवणार- फडणवीस
मुंबई : भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळावे यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. त्यांनी केलेल्या मागणीनंतर एक्सप्रेसवेची चौथी लेन सुरू करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करीन. सरकार याबाबत सकारात्मक पाऊले उचलेल. ड्रायव्हरचा जबाब बदलत आहे. घातपात आहे की नाही याची शंका उपस्थित होऊ नये म्हणून सीआयडी याचा तपास करत आहे. यात शासकिय मदत मिळण्यास काही त्रूट झाली आहे का? याचाही स्वतंत्र तपास केला जाईल. मंत्री- आमदार यांनी शक्यतो रात्रीचे प्रवास टाळा…. या अपघातातून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.