no images were found
सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस राज्य सरकारला मोठा दणका
नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून चार सदस्यांवरून तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तेत आल्यावर नवे आदेश देत परत एकदा राज्यात चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यसरकारला मोठा दणका बसला आहे.
त्यामध्येच प्रभाग रचनेवरून घोळ संपताना संपत नव्हता. अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून चार सदस्यांवरून तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तेत आल्यावर नवे आदेश देत परत एकदा राज्यात चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारच्या निर्णयाविरोधात पुण्यातील NCP चे कार्यकर्त्ये हे थेट कोर्टात गेले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका असल्याचे प्रशांत जगताप यांनी आज बोलताना म्हटले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.