Home मनोरंजन तुझ्याकडे तुला मागणे मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे पहिल्यांदाच साकारणार राजकारणी

तुझ्याकडे तुला मागणे मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे पहिल्यांदाच साकारणार राजकारणी

6 second read
0
0
7

no images were found

तुझ्याकडे तुला मागणे मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे पहिल्यांदाच साकारणार राजकारणी

स्टार प्रवाहवरील ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेली पंधरा वर्षं ढालगावच्या सरपंचपदावर आपलं वर्चस्व कायम राखणारी हिराबाई ढाले पाटील ही व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत.

    हिराबाईसाठी राजकारण म्हणजे केवळ गावाचा कारभार नाही, तर स्वतःची प्रतिष्ठा आणि वर्चस्व टिकवून ठेवण्याचं साधन आहे. भरपूर पैसा असावा, समाजात मानमरातब असावा आणि आपल्या शब्दाला वजन असावं, ही तिची महत्त्वाकांक्षा! वरकरणी गोड बोलणारी हिराबाई वेळ पडल्यास आपल्या खास कोल्हापुरी ठसक्यात समोरच्याला गप्प करायलाही मागेपुढे पाहत नाही. ‘फॅण्टॅस्टिक’ आणि ‘शिरतंय ताळक्यात’ हे दोन शब्द तिच्या तोंडी नेहमी ऐकायला मिळतात. हिराबाईच्या बोलण्यातला रांगडेपणा, वागण्यातला आत्मविश्वास आणि राजकारणातली धूर्त खेळी यामुळे हिराबाईची व्यक्तिरेखा विशेष ठरणार आहे.

       या भूमिकेविषयी सांगताना सुप्रिया पाठारे म्हणाल्या, ‘मी पहिल्यांदा राजकारणी भूमिका साकारणार आहे. हिराबाई ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तिचा कोल्हापुरी बाज, तिची देहबोली आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचं म्हणणं खरं करण्याची वृत्ती साकारताना खूप मजा येते आहे. ती बोलायला अत्यंत फटकळ असली तरी तिच्या बोलण्यात एक हुशारी आहे. समोरच्याला घोळात घ्यायचं असेल तर बोलण्यात असावी लागणारी नौटंकी आणि समोरच्याला आपल्या टाचेखाली ठेवायचं असल्यास लागणारी धार दोन्हीचा बेमालूम वापर करण्याच कसब तिच्यात आहे. तिच्या या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना नक्कीच आवडतील अशी आशा आहे.’

     हिराबाईंच्या राजकीय खेळी आणि तिच्या अनोख्या स्वभावामुळे ‘तुझ्याकडे तुला मागणे’च्या कथानकात कोणते नवे ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल. तेव्हा नक्की पाहा नवी मालिका तुझ्याकडे तुला मागणे रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

महायुतीच्या उमेदवार सौ.स्मिता जाधव यांचा विजय निश्चित:आमदार राजेश क्षीरसागर.

महायुतीच्या उमेदवार सौ.स्मिता जाधव यांचा विजय निश्चित:आमदार राजेश क्षीरसागर. कोल्हापूर (प्…