no images were found
दिवाळीच्या सणामध्ये गांधीनगर बाजारपेठेत भारनियमन नको – करवीर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक, रेडिमेट आदि जिवनाआवश्यक सर्वच वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ आहे. आता ऑक्टोंबर हिट सह दिपावली आल्याने येथे होलसेल खरेदीदारांची तसेच रिटेल खरेदीदारांची वर्दळ सुरू असून बाजारपेठ ही दिपावली वस्तुंनी सजली आहे. बाजार पेठेत हळुहळु गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. व्यापार पेठेत दिवसभर व सायंकाळी ग्राहकांची वर्दळ बाजारपेठेमध्ये दिसून येणार, असून दिपावली सणामध्ये रस्त्यावरतीही माल विक्री करणाऱ्या दुकानदारांची ही संख्या मोठी आहे. सदर दुकानातील विजेच्या उजेडामध्ये रस्त्यावरील विक्रेता आपला व्यापार करत असतो त्यामुळे गर्दीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची बाजार पेठेत वीज खंडीत होऊ नये याबाबत आपण योग्य ती दक्षता दयावी ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. तरी आपल्या कर्मचाऱ्या मार्फत गांधीनगर बाजार पेठेमध्ये ज्या ज्या ठिकाणी डांबावरती अतिरिक्त लोडमुळे विज खडीत होणार आहे अशा ठिकाणी आपण जबाबदारीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून घ्यावी जेणे करून दिवसा व रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकाराने वीज खंडीत होणार नाही झाली तरी तातडीने ती दुरूस्ती करून घेण्यास प्राध्यान्य दयावे. अलनिनोच्या प्रभावा मुळे मोठ्या प्रमाणात उष्मा असून दुकानातील गर्दीमुळे त्याच्यात आणखीनच भर होवू शकते, त्यामुळे दिपावली सणामध्ये वसुली थोडी बाजुला ठेवून ग्राहकांना अखंड विज देण्याचा आपण प्रयत्न करावा ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
*यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की दीपावली सणांमध्ये वीज खंडित च्या अनेक घटना घडत असल्याने रात्रीच्या गर्दीमध्ये चोरी होणे व एखाद्या महिलेची छेडछाड होणे असे प्रकार घडत असतात व व्यापारावर ही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तसेच रस्त्यावरती कपडे विकणारा वर्ग ही मोठ्या प्रमाणात गांधीनगर मध्ये आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत व्यापार पेठेत वीज खंडित होऊ नये ही शिवसेनेची मागणी आहे जर ज्यादा प्रमाणात वीज खंडित झाली तर अधिकाऱ्यांना ढोल वाजवून जागे करण्याचे आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळीअधिकारी म्हणाले की मी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन ज्या ज्या ठिकाणी वीज खंडित होते अशा ठिकाणी कर्मचारी नियुक्ती करून वीज खंडित होणार नाही याची दक्षता घेतो व अखंडित वीज व्यापारपेठेस देण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन शिवसेना शिष्टमंडळाला दिले
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. सचिन रामचंद्र वीर ,सहाय्यक अभियंतासो, विज वितरण कार्यालय, शाखा गांधीनगर, यांना देण्यात आले..
करवीर तालुका प्रमुख राजू यादव, फेरीवाले संघटना उपतालुका बाळासो नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला,उपशहर प्रमुख दीपक अंकल,उपशहर प्रमुख दीपक धिंग, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, नमेश चव्हाण, वसंत पोवार, कैलास जाधव, बाबुराव पाटील, रामराव पाटील, धनंजय पाटील, राजू साठे, जितू चावला आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.*