Home Uncategorized एशियन पेंट्स ‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’ सोबत साजरा करत आहे दिवाळीच्या तयारीचा आनंद.

एशियन पेंट्स ‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’ सोबत साजरा करत आहे दिवाळीच्या तयारीचा आनंद.

2 second read
0
0
3

no images were found

एशियन पेंट्स ‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’ सोबत साजरा करत आहे दिवाळीच्या तयारीचा आनंद.

मुंबई: दिवाळीचा खरा उत्साह साजरा करत, एशियन पेंट्स सादर करत आहे ‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’. ही एक म्युझिकल ऍड फिल्म आहे, जी दाखवते की दिवाळीची खरी सुरुवात तर घरातल्या तयारीनेच होते. दिवाळीचा उत्साह सण येण्याच्या खूप आधीच सुरू होतो. घराची साफसफाई आणि सजावटीपासून ते घराला नवीन रंगाचा फ्रेश कोट देण्यापर्यंत, प्रत्येक काम सणाच्या तयारीचा एक भाग बनून जातं. जेव्हा कुटुंब, भाऊ-बहिण, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी दिवाळीसाठी त्यांची घरे तयार करायला एकत्र येतात, तेव्हा रोजची साधी कामं सुद्धा कशी हास्यविनोदाचे आणि एकत्र येण्याचे क्षण बनतात, हे या फिल्ममध्ये दाखवलं आहे.

ही कॅम्पेन दिवाळीच्या तयारीतील उत्साह  एका रंगीबेरंगी म्युझिकलमधून जिवंत करते. यात एक आकर्षक,पावले थिरकायला लावणारी धून आणि मजेशीर गाणी आहेत. एशियन पेंट्सने भिंती रंगवण्यापासून ते साफसफाई आणि सजावटीपर्यंत, प्रत्येक तयारीला एका जिवंत साजरेपणात बदलताना ही फिल्म दाखवते, ज्यात कुटुंबे आपल्या प्रियजनांच्या स्वागतासाठी घर तयार करत आहेत.दिवाळीच्या दिवसांत घराची बदलती भूमिका एशियन पेंट्सला किती चांगली समजली आहे, हे या कॅम्पेनमधून दिसून येतं. नव्याने रंगवलेलं घर हे सणासाठी केवळ एक बॅकड्रॉप नसतं. त्यातून या सणाचा उत्साह, एकमेकांची काळजी आणि एकत्र येण्याची भावना दिसून येते. घरं जशी नव्याने तयार होतात, तशी नातीही घट्ट होतात आणि दिवाळीचा खरा उत्साह जिवंत होतो.

या कॅम्पेनबद्दल बोलताना, अमित सिंगल, सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर, एशियन पेंट्स म्हणाले, “दिवाळी फक्त एक सण नाही; ही एक भावना आहे, जी सण साजरे करण्याच्या खूप आधीपासून मनात तयार होऊ लागते. या प्रवासात तयारी हा एक महत्त्वाचा भाग आहे. यादरम्यान एकत्र कामं करताना, गप्पा मारताना आणि आनंदाचे क्षण शेअर करताना कुटुंब आणि प्रियजन एकत्र येतात. ‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’ मधून आम्हाला दिवाळीच्या आधीच्या या सुंदर तयारीलाच साजरे करायचं होतं. एशियन पेंट्ससोबत घराला एक ताजेतवाने नवे रूप देण्यासह प्रत्येक तयारी कशी सणाच्या अनुभवाचा एक भाग बनते, हे आम्हाला अधोरेखित करायचं होतं. आमच्या म्युझिकल ऍड फिल्ममधून, आम्ही तोच उत्साह, तोच आपलेपणा आणि तीच एकत्र येण्याची भावना व्यक्त केली आहे, जी दिवाळीच्या तयारीला खूप विशेष बनवते.”

‘तैय्यारी शुरू, त्योहार शुरू’ सोबत, एशियन पेंट्स दिवाळीच्या आधीच्या दिवसांमध्ये वाढणारा उत्साह साजरा करत आहे. आपल्या पहिल्या-वहिल्या म्युझिकल ऍड फिल्ममधून, हा ब्रँड दाखवतो की सण सुरू होण्याआधीच रंग, हास्य, संगीत आणि एकत्र येण्याची भावना घरांना दिवाळीच्या उत्साहाने कशी भरून टाकते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती

शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती कोल्हापूर,: – शिवाजी विद्यापीठात आज महर्षी …