
no images were found
अजितदादांनी ‘शकुनी मामा’ पासून सावध राहावं: निलेश भोसले
मुंबई : अजित दादांनीपांढऱ्या दाढीवाल्या ‘शकुनी मामा’ पासून सावध राहणं गरजेच आहे. हा शकुनी मामा तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.निलेश भोसले यांनी केलं. त्यांनी पांढऱ्या दाढीचा ‘शकुनी मामा’ नेमकं कोणाला म्हटलं ते सांगतिलं नाही. त्यांनी कोणाचही नाव घेतलं नाही. त्यामुळ निलेश भोसलेंचा नेमका रोख कोणाकडं याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा स्वभाव महाभारतामधील कर्णासारखा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचे भोसले म्हणाले. पण त्यांनी पांढऱ्या दाढीच्या शकुनी मामा पासून सावध राहवे असे भोसले म्हणाले.