
no images were found
मंत्री छगन भुजबळ यांनी पवारांवरील जहरी टीकेनंतर बीडच्या उत्तरसभेत गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाने बीडमध्ये घेतलेल्या उत्तरसभेत चांगलाच गोंधळ उडाला. सभेसाठी धनंजय मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून मोठी गर्दी जमवली होती. दुपारी तीन वाजता होणारी सभा सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. सभेची सुरुवात करताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून शरद पवारांना लक्ष्य केले.
त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याविरोधात टीका सुरू केली. पवारांवर जहरी टीका करताना भुजबळांनी तेलगी प्रकरणात तुमच्यावरही आरोप झाले होते, असा उल्लेख करताच गर्दीतील गोंधळ कमालीचा वाढला. लोक भुजबळांचे भाषण ऐकायला तयार नव्हते. आरडाओरड थांबत नसल्याने अखेर भुजबळांना भाषण गुंडाळावे लागले
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शरद पवारांविरुद्ध कुठलेही भाष्य न करता दुष्काळी परिस्थितीवरच बोलणे पसंत केले