0 second read
0
0
45

no images were found

“हर घर सावरकर” अभियानातून स्वातंत्रवीर सावरकरांच्या विचारांचा जागर : श्री.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : (प्रतिनिधी ) स्वातंत्रवीर सावरकरांचे विज्ञानवादी, देशप्रेम आणि हिंदुत्वाचे विचार आपल्यामध्ये नेहमीच उत्साह आणि देशप्रेम जागवतात. अत्यंत प्रेरणात्मक विचार स्वातंत्रवीर सावरकरांनी रूजवले याच विचारांचा जागार “हर घर सावरकर” या संकल्पनेतून करण्यात येणार आहे. या संकल्पनेतून स्वातंत्रवीर सावरकरांच्या देशभक्तीचे विचार घराघरात पोहचविण्यात येणार असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शिवसेना- भाजप युतीच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गुरुवार दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता “संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर” येथे “सागरा प्राण तळमळला” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा” या आर्त शब्दात मातृभूमी विषयची ओढ दर्शविणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्ती आणि हिंदुत्ववादी विचारांची देशाच्या युवा पिढीला आवश्यकता आहे. ‘जयोस्तुते जयोस्तुते’ हे गाणं ऐकल्यानंतर एक वेगळीच स्फुर्ती मराठी माणसाच्या अंगात संचारते आणि समोर उभा राहतो तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा चेहरा. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खूपच मोठे योगदान आहे. इतिहासात अजरामर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर होय. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विचारांचा वसा जपत त्यांचे देशभक्तीपर विचार घरोघरी पोहचवून युवा पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी शिवसेना – भाजप युतीच्या वतीने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री ना.मा.श्री.उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाने “हर घर सावरकर” अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. राज्यामध्ये या उपक्रमास उदंड प्रतिसाद लाभत आहे. यामध्ये स्वातंत्रवीर सावरकर यांचे विचार जनमानसात पोहचण्यासाठी “सागरा प्राण तळमळला” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नाट्यप्रयोग करवीरवासियांसाठी विनामुल्य असणार आहे. याकरिता आवश्यक प्रवेशिका “शिवालय” शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ येथे उपलब्ध असणार आहेत. तरी या उपक्रमासाठी समस्त करवीरवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, युवा सेना संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, गणेश रांगणेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा.गिरीराज सिंग यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा.गिरीराज सिंग यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन   कोल्हाप…