no images were found
फिफा विश्वचषकादरम्यान सराव करताना २२ वर्षीय फुटबॉलपटूचे निधन
मुंबई: कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकादरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अर्जेंटिनाच्या फर्स्ट डिव्हिजन क्लब ॲटलेटिको टुकुमनचा मिडफिल्डर आंद्रेस बालांटा यांचे निधन झाले आहे. या फुटबॉलपटूचे वय फक्त २२ वर्ष होते.
बहुतेक खेळाडू वयाच्या २२ व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात करतात, परंतु आंद्रेस बालांटासोबत ही दुःखद घटना घडली आणि त्याने जगाचा निरोप घेतला. ॲटलेटिको टुकुमन क्लबसाठी प्रशिक्षण घेत असताना मंगळवारी (२९ नोव्हेंबर) आंद्रेस बालांटाला अपघात झाला. आंद्रेस प्रशिक्षणादरम्यान खाली पडला होता. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातील डॉक्टरांनी आंद्रेस बालांटाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. क्लबच्या वैद्यकीय कर्मचार्यांनी आंद्रेस बालांटाला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
ॲ टलेटिको टुकुमन क्लबने नुकतीच सुट्टी साजरी केली होती, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. या विश्रांतीनंतर संघाचे हे पहिले सराव सत्र होते. या घटनेनंतर ॲ टलेटिको क्लबचे अधिकारी इग्नासियो गोलोबिस्की म्हणाले, ‘आम्ही आंद्रेस बालांटाच्या निधनाबद्दल अत्यंत दुःखात आहोत. क्लबचे सर्व चाहते खूप निराश झाले आहेत आणि त्यांना धक्का बसला आहे.