no images were found
मुंबईत १३ वर्षांच्या विध्यार्थीनीवर वर्गात कोंडून सामूहिक अत्याचार
मुंबईः भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई अत्याचाराच्या घटनेने पुन्हा हादरली. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील महानगर पालिकेच्या शाळेतच ही घटना घडली असून आरोपींदेखील अल्पवयीन असल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बीएमसीच्या शाळेतच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
१३- १४ वर्ष वयोगटातील शाळकरी मुलांनी त्यांच्यात शाळेत शिकणाऱ्या मुलीला वर्गात बंद केले. त्यानंतर एका मुलाने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱ्याना विनयभंग केल्याचं पीडितेने म्हटलं आहे. पीडित मुलीला वर्गात घेऊन गेल्यानंतर आरोपींच्या टोळीतील दोन मुलं वर्गाबाहेर पहारा देत असल्याचंही समोर आलं आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. ज्या वेळेस ही घटना घडली आहे त्याचवेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक शाळेतील वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमात होते. त्याचवेळी आरोपींनी हा क्रुर खेळ रचला. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला असून दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याकारण्याने त्यांना डोंगरीतील बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.
पोलिसांनी सांगितले की, चारही आरोपी आणि पिडीत मुलगी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता आठवीत शिकत आहेत. सोमवारी ज्यावेळेस शिक्षक आणि विद्यार्थी शाळेतील वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमात होते. तेव्हा दोन मुलांनी तिला वर्गात बंद करुन ठेवले तर दोघ बाहेर पहारा देत थांबले. त्याचवेळी त्यातल्या एकाने तिच्यावर बलात्कार केला तर, दुसऱ्या मुलाने तिच्यावर शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असं पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे. सोमवारी पीडिता घरी आली त्यावेळेत तिच्या गुप्तांगात दुखत असल्याचे तिने आईला सांगितले. आईला शंका आल्यानंतर तिने मुलीला नेमकं काय घडलं ते विचारलं त्यावेळेस सगळा प्रकार उघडकीस आला आहे. चार आरोपींपैकी दोघांना पकडण्यात यश आलं असून दोघं अद्याप फरार आहेत. या दोघांचाही मुंबई पोलिस शोध घेत आहे.