no images were found
कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 16 हजार लाभार्थ्यांचा डाटा अपलोड
कोल्हापूर : पी. एम. किसान योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 83 हजार 696 लाभार्थी आहेत. यातील 4 लाख 16 हजार 751 लाभार्थ्यांचा डाटा भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करून अपलोड केलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती घेऊन 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यात कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक आहे.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी पीएम किसान योजना, सेवा पंधरवडा कार्यक्रम, केवायसी, किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारत योजना आदींचा आढावा घेऊन केंद्र पुरस्कृत योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणेला निर्देश दिले. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी मार्गदर्शन केले. या दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीस सर्व जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.