Home मनोरंजन चिखल अंगावरून काढण्यासाठी मी जवळपास चार तास शॉवरखाली घालवले,” – मुकुल हरीश

चिखल अंगावरून काढण्यासाठी मी जवळपास चार तास शॉवरखाली घालवले,” – मुकुल हरीश

0 second read
0
0
6

no images were found

चिखल अंगावरून काढण्यासाठी मी जवळपास चार तास शॉवरखाली घालवले,” – मुकुल हरीश

सोनी सबच्या ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पात्रांच्या आयुष्यात अनपेक्षित आव्हाने आणि भावनिक चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहेत. नुकतेच पुष्पा (कौर्णा पांडे) आणि टायगर (मुकुल हरीश) यांना ते आई आणि मुलगा असल्याचे समजले असून, आता एकमेकांना समजून घेण्याचा आणि एकमेकांच्या आयुष्यात स्वतःचे स्थान शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या नात्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

आगामी भागात टायगर एका अनपेक्षित परिस्थितीत अडकतो, जेव्हा तो गटारात पडलेल्या एका लहान मुलीला वाचवण्यासाठी धाडसाने पुढे येतो. क्षणाचाही विलंब न करता तो तिला वाचवण्यासाठी गटारात उडी मारतो आणि नकळतपणे एक नायक ठरतो. टायगरसाठी हा प्रसंग जरी धाडसी असला, तरी तो पडद्यावर साकारताना मुकुल हरीशसाठी ते अजिबात सोपे नव्हते. या दृश्याच्या चित्रीकरणासाठी त्याला पूर्णपणे चिखलाने माखावे लागले, ज्यामुळे हा अनुभव शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक ठरला. कॅमेरे बंद झाल्यानंतरदेखील त्याच्या परीक्षा संपल्या नाहीत. अंगावरील सगळा चिखल काढण्यासाठी मुकुलला जवळपास चार तास शॉवरखाली घालवावे लागले. मात्र, या कष्टप्रद अनुभवाकडे तो आजही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय चित्रीकरणांपैकी एक म्हणून पाहतो.

टायगरची भूमिका साकारणाऱ्या मुकुल हरीशने सांगितले, “हे मी चित्रीत केलेल्या सर्वात शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि संस्मरणीय दृश्यांपैकी एक होते. एका मुलीला वाचवण्यासाठी मला गटारात उतरावे लागले आणि दृश्य पूर्ण होईपर्यंत माझे डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर चिखलाने माखले होते. माझा लूक इतका वास्तववादी दिसत होता की सेटवरील अनेक लोकसुद्धा मला ओळखू शकत नव्हते. खरा संघर्ष मात्र दृश्य संपल्यानंतर सुरू झाला. अंगावरील सगळा चिखल काढण्यासाठी मी जवळपास चार तास शॉवरखाली घालवले. अभिनेता म्हणून असे अनुभव आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्यास भाग पाडतात आणि हा प्रवास अधिक रोमांचक बनवतात. हे चित्रीकरण खूप आव्हानात्मक होते, पण हा अनुभव मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …