no images were found
‘चुडैल चली ससुराल’मध्ये हिबा नवाब साकारणार एक लाडकी चेटकीण
सोनी सब आपल्या आगामी कौटुंबिक सिटकॉम चुडैल चली ससुराल द्वारे प्रेक्षकांसाठी हास्य, प्रेम आणि जादुई गोंधळाचा मनोरंजक संगम घेऊन येण्यास सज्ज आहे. ही मालिका लोकप्रिय कथेला भारतीय अंदाजात नव्या स्वरूपात सादर करत असून, दैनंदिन कौटुंबिक क्षणांना कल्पनारम्य जादूची जोड देते. या मोहक कथेच्या केंद्रस्थानी अभिनेत्री हिबा नवाब असून, ती उर्वशीची भूमिका साकारणार आहे. जादुई दुनियेतील तिचा प्रवास वैवाहिक आयुष्यापर्यंत पोहोचताना अनेक मनोरंजक घडामोडी घडवून आणणार असून, प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे.
चुडेल चली ससुराल ही उर्वशीची कथा आहे. प्रेमासाठी आपल्या जादुई जगाचा त्याग करून ती आरव पटेल आणि त्याच्या कुटुंबासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करते. एक सामान्य माणसासारखे जीवन जगण्याचा निर्धार केलेली उर्वशी रोजच्या आयुष्यातील अनेक अशा परिस्थितींना सामोरी जाते ज्या तिच्यासाठी सहजस्वाभाविक नसतात. तिचे हेतू नेहमीच चांगले असले तरी इतरांना मदत करण्यासाठी ती कधीकधी जादूचा वापर करते आणि त्यातून अनपेक्षित तसेच विनोदी गोंधळ निर्माण होतो. उबदार कौटुंबिक वातावरण आणि कल्पनारम्य जादुई जगाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका विनोद, भावना आणि फॅन्टसीचा मनोरंजक संगम सादर करते. उर्वशीच्या व्यक्तिरेखेमुळे चेटकीणीच्या प्रतिमेला एक वेगळा आणि ताजातवाना पैलू मिळतो. ती दयाळू, प्रेमळ आहे आणि नेहमीच स्वतःपेक्षा आपल्या प्रियजनांना अधिक महत्त्व देते.
भूमिकी बद्दलचा आपला उत्साह व्यक्त करताना हिबा नवाब म्हणाली, “‘चुडैल चली ससुराल’मधून पुन्हा एकदा सोनी सब कुटुंबाचा भाग बनल्याच मला खूप आनंद आहे. उर्वशीच्या व्यक्तिरेखेतील सर्वांत आकर्षक गोष्ट म्हणजे ती चेटकीणीच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती गोड, निरागस आहे आणि नेहमी मनापासून निर्णय घेते. गोष्टी बिघडल्या तरी तिचे हेतू नेहमीच चांगले असतात आणि त्यामुळे तिचा प्रवास खूप आपलासा वाटतो. मला हे खूप आवडते की ती प्रत्येक गोष्टीपेक्षा प्रेम आणि कुटुंबाला अधिक महत्त्व देते आणि एका पूर्णपणे नव्या जगात स्वतःचे स्थान शोधण्याचा सतत प्रयत्न करते. या मालिकेत भरपूर विनोद, आपुलकी आणि जादूची हलकीशी रंगत आहे, आणि उर्वशीची व्यक्तिरेखा साकारताना मी प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घेत आहे. प्रेक्षकांनी उर्वशीला भेटावे आणि या मजेशीर प्रवासाचा भाग व्हावे यासाठी मी खूप उत्सुक आहे.”