Home क्राईम बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस

बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस

0 second read
0
0
124

no images were found

बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस

मुंबई : कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. हा संपूर्ण घोटाळा १०० कोटींचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भात आता ईडी अधिकाऱ्याने चहल यांना चौकशीसाठी बोलवलं आहे.
बीएमसीकडून कोव्हीड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. आणि यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप करत यामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच भाजपने ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने जून २०२० ते मार्च २०२१ पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम केली. ही कंपनी नवीन असल्याचं आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास येताच पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. असं असताना सुद्धा बीएमसीने मात्र या कंपनीचे काम सुरू ठेवले. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्टमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला. याच गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा,आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्या संदर्भात बीएमसीकडे काही माहिती आणि कागदपत्र मागवले.
मात्र बीएमसी कडून या संदर्भात कुठल्याही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टाळाटाळ होत असल्याने आता बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना नोटीस पाठवली आहे. कोरोनामध्ये मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं. शिवाय कंत्राट प्राप्त करून घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे. ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे…कंपनीची स्थापना जून २०२० मध्ये झाली डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर ,संजय शहा ,राजू साळुंखे हे भागीदार आहेत. या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टर साहेब ज्युनिअर इनटर्नशिप डॉक्टर नेमल्याचे व कंत्राट मधील अटी व शर्तीचा भंग केल्याचा निदर्शनास आलं. सदर कंपनी नवीन असून तिला अनुभव नसतानाही कंत्राट दिली असेल निदर्शनास आलं त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करून २५ लाख रक्कम जप्त केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…