Home Uncategorized सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

0 second read
0
0
7

no images were found

सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

कोल्हापूर, : कोल्हापुरातील बंगाली बांधवांची सामाजिक-सांस्कृतिक संस्था असलेल्या न्यू युवा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक श्रीश्री काली पूजा उत्सव २०२६ चे आयोजन केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक यांनी दिली.

ते म्हणाले, यंदा काली माता पूजा उत्सवाचे १४ वे वर्ष असून, हा उत्सव ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे होणार आहे.

याचे कार्यक्रम असे : रविवार ८ नोव्हेंबर – मुख्य काली माता पूजा (रात्रभर), रात्री ९ वा. – पूजा, १० वा. – चक्कूदान, ११ वा. – पुष्पांजली, १२ वा. – चंडिपाठ, रात्री ८.३० ते ११ – भोग प्रसाद, सोमवार ९ नोव्हेंबर

सकाळी ११.३० वा. – नित्यपूजा, रात्री ८.३० वा. – संध्या आरती, मंगळवार १० नोव्हेंबर सकाळी ११ वा. – नित्यपूजा, दुपारी १२ वा. – सत्यनारायण पूजा, रात्री ८.३० वा. – संध्या आरती, बुधवार ११ नोव्हेंबर – विसर्जन. सकाळी १० वा. – नित्यपूजा, ११ वा. – घट विसर्जन, दुपारी १२ वा. – सिंदूर खेळा, दुपारी ३ वा. – शोभायात्रा व मूर्ती विसर्जन.

अध्यक्ष – कार्तिक घोष, समीर पात्रा, बापन सासमल, उपाध्यक्ष – शामसुंदर पाल, अजित मान्ना, नबकुमार जाना, सचिव – अतनू पात्रा, सिद्धार्थ सामंत्रा

खजिनदार – तपन दास, बिश्वजित घोराई, मनीशंकर घोरानी यांच्यासह शुभोदीप पात्रा, संदीप मान्ना, दिप्पेंदू पोर्या, तन्मय घोष, ओंकार मंडल, संदीप पॉल, आकाश जाना, राहुल भौमिक, मुकेश घोष, प्रियम घोरानी, राणी मंडल, आनंद सामंता, तुषार खामरुई, बिनीत प्रामाणिक, सुमन माजी यांच्यासह न्यू युवाचे सदस्य व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सर्व कोल्हापूरकरांनी कुटुंबासह व मित्रपरिवारासह या पूजोत्सवाला येऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल

गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल कोल्हाप…