Home क्राईम अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच, व्हिडिओ क्लिप आणि धमक्या; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच, व्हिडिओ क्लिप आणि धमक्या; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

1 second read
0
0
46

no images were found

अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच, व्हिडिओ क्लिप आणि धमक्या; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई :  एका डिझायनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरुद्ध केलेल्या तक्रारीने खळबळ उडाली आहे.मुंबईतील एका डिझायनर 1 कोटी रुपयांची लाचेची ऑफर दिली, तसेच धमकी आणि कट रचला होता, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील डिझायरने अमृता फडणवीस यांना विशिष्ट स्वरूपाची माहिती पुरवण्यासाठी आणि वडिलांविरुद्ध असलेला गुन्हा कुमकुमत करण्यासाठी 1 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमृता फडणवीस यांनी ज्या डिझायनरवर आरोप केले आहेत, तिचं नाव अनिक्षा असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलेलं आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटींच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिली होती. पुढे अमृता फडणवीसांनी तक्रारीत असाही आरोप केलेला आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश एका अज्ञात फोन नंबरवरून त्यांना पाठवले. तिच्या वडिलांसोबत, ती महिला अप्रत्यक्षपणे अमृता यांना धमकी देत होती. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरबद्दल विचारल्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली की, तपास सुरू आहे परंतु अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…