no images were found
हजारो भाविकांनी घेतला चित्पावन संघाच्या अष्टमी जागर सोहळ्याचा लाभ
कोल्हापूर: कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी मंगलधाम हॉल येथे श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत सकाळी नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक विधी संपन्न झाले. यामध्ये श्री पूजा, तुलसी पूजन, आरती,दुपारी महाप्रसाद झाला. तर सायंकाळी सात नंतर तांदळाच्या उकडीपासून बनवलेल्या मुखवट्याची देवी उभी करून दर्शन पूजा पठण व नैवेद्य झाला.त्यानंतर महिलांनी एकत्र येऊन घागरी फुंकण्याबरोबर पारंपारिक गीते सादर केली. तसेच चित्पावन महिला मंडळाच्या वतीने खास देवीच्या देवीच्या गाण्यांवरती टिपऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मंगलमय व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. हजारो भाविकांनी या देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
रात्री उशिरापर्यंत देवीचा जागर सुरू होता. तसेच भक्तांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमास अध्यक्ष मकरंद करंदीकर उपाध्यक्ष प्रसाद भिडे सचिव केदार जोशी, माधुरी करंदीकर, अश्विनी भिडे, संगीता आपटे, सीमा गोखले, पंकजा गोरे, दत्तात्रय आपटे, शुभम साने, संतोष साने, किरण जोशी, ऋषिकेश लिमये, श्रीकांत लिमये आणि निखिल गोखले आदी उपस्थित होते.